पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:32 PM2017-09-14T17:32:25+5:302017-09-14T17:49:38+5:30

माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

Gram Panchayats scam, cost of maintenance of water supply scheme, 11 municipal water | पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

googlenewsNext
ठळक मुद्देमाजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते.देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात.

माजलगाव ( बीड ), दि. 14 : माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहर व 11 गावे अशी १२ गावांची तहान भागवणारी पाणी पुरवठा योजना म्हणून या योजनेची ओळख आहे. यात शेलापुरी, रेणापुरी, चिंचगव्हाण, देवखेडा, नांदुर,भाटवडगांव, मनुर आदी गावांना माजलगांव धरणात असलेल्या जॅकवेलद्वारे फिल्टर प्लॅंटमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. योजना राबवताना नगर पालिका व संबंधीत 11 खेडे यांच्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या रकमेसंबंधात स्पष्ट करार झालेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने देखभालीची जबबादारी घेत त्यांचा हिस्सा उचलायचा असुन 11 खेडयांनी देखील त्यात आपली हिस्सेदारी जमा करावयाची आहे. 

करारानुसार मागील अनेक दिवसांपासुन नगर पालिका या 11 खेडयांमधील कारभा-यांना पैसे जमा करण्या बाबत वारंवार कळविते. परंतु,  सदरील 11 खेडयांमधील कारभारी मात्र पालिकेने दिलेल्या नोटीसांना दाद देण्यास तयार नसतात. पालिकेने चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु, कधी 10 हजार तर कधी 5 हजार अशी जुजबी रक्कम भरु ते आश्वासन देत. देखभाल खर्च मोठा असल्याने शेवटी पालिकेने मागील आठ दिवसांपासुन संबंधीत गावांचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. येणा-या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने या गावात एकच खळबळ उडाली आहे. 

18 लाखाचे येते बिल 
 नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात. या खर्चाचा मोठा ताण पालिकेवर पडत आहे त्यामुळे नाईलाजास्तव पालिकेस हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाणी पुरवठा अधिका-यांनी सांगितले.  यासोबतच ११ गावचे प्रतिनिधी आपला वाटा भरत नाहीतच उलट पुरवठा सुरु करा नाहीतर आंदोलन करू अशा धमक्या देतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

रक्कम भरताच पाणी पुरवठा पुर्ववत करू 

ही योजना 13 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून या योजनेतून शहरा बरोबरच 11 खेडयांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु,  संबंधीत ग्रामपंचायतींना वारंवार सुचना तसेच नोटीस देवून देखील ते देखभाल व दुरुस्तीसाठी साठीचे रक्कम पालिकेकडे जमा करीत नाहीत. रक्कम जमा करताच पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. 
-सहाल चाउस, नगराध्यक्ष  

Web Title: Gram Panchayats scam, cost of maintenance of water supply scheme, 11 municipal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.