धारूर येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:04+5:302021-05-28T04:25:04+5:30
धारूर : तालुका खरेदी-विक्री संघाने एफसीआयचे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले असून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले ...
धारूर : तालुका खरेदी-विक्री संघाने एफसीआयचे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले असून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धारूर येथे तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी हमीभावात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी-विक्री संघ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी संयुक्तपणे हे खरेदी केंद्र बाजार समिती आवारात सुरू केले असून ६५९ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हरभरा घालता येणार आहे. प्रतिहेक्टर १० क्विंटल हरभरा एका शेतकऱ्यास घालता येणार असून प्रतिदिवशी एका शेतकऱ्यांचा फक्त ३० क्विंटल पेरा नोंद असणे बंधनकारक आहे. या खरेदी केंद्रावर सर्व सोयीसुविधा करून खरेदी-विक्री संघाने ही खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळण्यासाठी खरेदी-विक्री संघाचे सचिन चोले, भारत चव्हाण व खरेदी-विक्री संघाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
===Photopath===
270521\img_20210525_140734_14.jpg