Grampanchayat Voting : आष्टी तालुक्यातील ३३ मतदान केंद्रावर सुरळीत मतदान; पहिल्या ४ तासात ३४.१६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 02:11 PM2021-01-15T14:11:37+5:302021-01-15T14:13:38+5:30
Grampanchayat Voting : मतदान वाढवण्याकरिता पॅनल प्रमुखांची दमक्षाक
आष्टी : तालुक्यातील ३३ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली असून सुरळीत मतदान सुरु आहे. झाले सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३४.१६ टक्के मतदान झाल्याची माहिती नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे यांनी दिली आहे.
आष्टी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या मतदानासाठी ३३ मतदान केंद्रावर १४८ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वत्र पोलीसांचा बंदोबस्त तैनात आहे. मतदान वाढवण्याकरिता पॅनल प्रमुख,उमेदवार,कार्यकर्ते मतदारांना कार, रिक्षा आणि टू व्हीलरवर मतदान केंद्रावर घेऊन येत आहेत. निवडणूक कार्यालयाकडून ३३ मतदान केंद्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता सोशल डिस्टंसिंगचे पालन होत आहे.
तसेच ज्या मतदाराच्या तोंडावर मास्क नाही त्यांना मास्क दिला जात आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराची थर्मल मशीनद्वारे तपासणी करुन हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. पहिल्या चार तासात ३४.१६ टक्के मतदान झाले असून दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे.