महाआघाडी सरकारने जनतेशी बेईमानी केली- राजेंद्र मस्के.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:03 AM2021-02-06T05:03:53+5:302021-02-06T05:03:53+5:30

बी़ड : वीज तोडणी मोहिमेच्या विरोधात भाजपाने महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन जिल्ह्यात टाळे ठोको आंदोलन केले. बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र ...

Grand Alliance government betrayed the people - Rajendra Muske. | महाआघाडी सरकारने जनतेशी बेईमानी केली- राजेंद्र मस्के.

महाआघाडी सरकारने जनतेशी बेईमानी केली- राजेंद्र मस्के.

Next

बी़ड : वीज तोडणी मोहिमेच्या विरोधात भाजपाने महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन जिल्ह्यात टाळे ठोको आंदोलन केले. बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

महावितरण कंपनीने ७५ लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली. चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महावितरण कंपनी करत आहे. लॉकडाऊन काळात रिडींग न घेता भरमसाठ रकमेचे वीज बिल देण्यात आली. वीज बिलात सवलत मिळणार, या आशेवरती बहुसंख्य वीज ग्राहकांनी विज बिल भरली नाहीत. विधानसभा अधिवेशन काळात वीज बिल सवलत देण्याचा पुनरुच्चार केला गेला. परंतु आज मात्र प्रत्यक्षात सक्तीतीने वीजबिल वसुलीचा तगादा महाविकास आघाडी सरकारने सुरू केला. सामान्य वीजग्राहकांना आधार देण्याऐवजी त्यांच्या घरात अंधार करण्याचे पाप महाआघाडी सरकार करत आहे. घोषणा केल्याप्रमाणे कोरोना काळातील वीजबिलात सवलत आणि वाढीव विज बिल दुरुस्त करून दंड व व्याजाची रक्कम वजा करून वीज बिल सवलत देवून, जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता असताना वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवणे हे आघाडी सरकार करून जनतेला आर्थिक आर्थिक खाईत ढकलण्याचे कृत्य आहे. सरकारने राज्यातील जनतेशी बेइमानी केली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

महावितरणच्या निषेधार्थ बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनीच्या जालना रोड बीड येथील कार्यालयास टाळा ठोकून निषेध करण्यात आला. यावेळी भगीरथ बियाणी, प्रा.देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, डॉ.लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, गणेश पुजारी, विलास बामणे, किरण बांगर, संध्याताई राजपूत, संगीता धसे, संजीवनी राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Grand Alliance government betrayed the people - Rajendra Muske.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.