आजी, घाबरू नका, आम्ही आहोत, लवकरच ठणठणीत व्हाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:36+5:302021-07-14T04:38:36+5:30

बीड : आजी, काही त्रास नाही ना होत? आता कसं वाटतंय? घाबरू नका, आम्ही सोबत आहाेत. लवकरच ठणठणीत व्हाल, ...

Grandma, don't panic, we're here, you'll be cool soon! | आजी, घाबरू नका, आम्ही आहोत, लवकरच ठणठणीत व्हाल !

आजी, घाबरू नका, आम्ही आहोत, लवकरच ठणठणीत व्हाल !

Next

बीड : आजी, काही त्रास नाही ना होत? आता कसं वाटतंय? घाबरू नका, आम्ही सोबत आहाेत. लवकरच ठणठणीत व्हाल, असे म्हणत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ९२ वर्षांच्या आजीबाईला आधार दिला. होम आयसोलेट असलेल्या आजीबाईंना भेटण्यासाठी सीईओ कुंभार स्वत: घरी गेले होते. सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे होते.

कोेरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, मुख्य कार्यकारी अधिकारी गावांत, कोविड केअर सेंटरला भेटी देत आहेत. तसेच तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना करत आहेत. मंगळवारीही कुंभार पाटोदा तालुक्यात गेले होते. अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी कुसळंब येथील कोविड सेंटरला भेट दिली. गावातील पॉझिटिव्ह लोकांना अचानक कॉल करून तपासणी केली. कोणीही होम आयसोलेट राहणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.

दरम्यान, सीसीसीपासून काही अंतरावरच ९२ वर्षांच्या आजीबाईंना आरोग्य विभागाच्या निगरानीत आयसोलेट केलेले आहे. त्या ठिकाणी स्वता: कुंभार गेले व आजीबाईंच्या आजाराची चौकशी करून त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. यावेळी डॉ. एल. आर. तांदळे, समुदाय आरोग्य अधिकारी सोनल लद्दे आदींची उपस्थिती होती.

डीएचओ, टीएचओंमुळे सीसीसीत सुधारणा

जिल्ह्यात लोकसहभागातून सुरू झालेली कुसळंबची सीसीसी सुधारण्यात गावचे सुपुत्र तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. याच सीसीसीची संकल्पना पाहून जिल्हाभरात ५० पेक्षा जास्त सीसीसी सुरू झाल्या होत्या.

130721\13_2_bed_11_13072021_14.jpeg

कुसळंबच्या आजीबाईंना घरी जावून विचारपूस करताना सीईओ अजित कुंभार, सोबत टीएचओ डॉ.एल.आर.तांदळे होते.

Web Title: Grandma, don't panic, we're here, you'll be cool soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.