निराधारांचे अनुदान नऊ महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:51+5:302021-03-25T04:31:51+5:30

: तालुक्यात १६ जुन रोजी झालेल्या बैठकीत निराधारांचे मंजूर अर्ज असणाऱ्या लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या ...

Grants for the destitute have been stagnant for nine months | निराधारांचे अनुदान नऊ महिन्यांपासून रखडले

निराधारांचे अनुदान नऊ महिन्यांपासून रखडले

Next

: तालुक्यात १६ जुन रोजी झालेल्या बैठकीत निराधारांचे मंजूर अर्ज असणाऱ्या लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या निराधारावर उपासमारीची वेळ आली आहे. या लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वितरीत करावे आशी मागणी तालुका निराधार योजना समितीचे सदस्य तथा सुरनरवाडीचे सरपंच शिवाजी काळे यांनी केली आहे.

धारुर तालुक्यातील निराधारांचे अर्ज मंजूर करण्यासाठी १६ जून रोजी प्रशासकीय समितीची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक निराधारांचे श्रावणबाळ योजनेतील व संजय गांधी निराधार योजनेतील मंजूर होऊनही नऊ महिन्यांपासून या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने या प्रश्नाकडे ली देऊन लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वितरित करावे अशी शिवाजी माने यांनी केली आहे.

Web Title: Grants for the destitute have been stagnant for nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.