विलासराव देशमुख जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेसचे अभिवादन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:53+5:302021-05-28T04:24:53+5:30
यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू समजून, लोकनेते विलासराव देशमुख यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या ...
यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू समजून, लोकनेते विलासराव देशमुख यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली. तरुण कार्यकर्त्यांनी लोकनेत्याचा आदर्श घेऊन समाजाभिमुख कार्य करावे, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी प्रास्ताविक केले. सुनील व्यवहारे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक मनोज लखेरा, अमोल लोमटे, वाजेद खतीब, धम्मपाल सरवदे, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण, भारत जोगदंड, दिनेश घोडके, अकबर पठाण, सुशील जोशीसहीत एन.एस.यू.आय, युवक काँग्रेस, सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बुद्ध जयंतीनिमित्त वंदन
यावेळी विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त वंदन करण्यात आले. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. सद्गुणांचा विकास, समता तत्त्वाचा प्रभाव, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास, नैतिक सिद्धांताचा प्रभाव, करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशीलता, शीलसंवर्धन यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आल्याचे राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.
===Photopath===
260521\5309avinash mudegaonkar_img-20210526-wa0077_14.jpg