के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:13+5:302021-08-12T04:37:13+5:30
यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी ...

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची गर्जना केली आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र देशातील हजारो तरूणांना दिला. हे आंदोलन अहिसेंच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. यावेळी १८५७ ते १९४२ या कालखंडातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. आबासाहेब हांगे यांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्याचा विचार क्रांतिकारकांनी केला. त्यामध्ये लाल-बाल-पाल यांनी एक लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. खाकरे पंडित तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शिंदे अनिता यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. सय्यद एल.एन., पदवीधर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिता शिंदे, डॉ. खान ए.एस., प्रा. दत्तात्रय नेटके, प्रा.रवींद्र शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.
100821\10bed_12_10082021_14.jpg
के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीराना अभिवादन.