शहीद सुनील राख यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:11+5:302021-01-03T04:33:11+5:30
पाटोदा : भारतीय सैन्यात देशसेवा करताना तीन सैनिक शहीद व निजामाच्या ताब्यातून मराठवाड्याचा भूभाग मिळविण्यासाठीच्या लढ्यात एक स्वातंत्र्य सैनिक ...
पाटोदा : भारतीय सैन्यात देशसेवा करताना तीन सैनिक शहीद व निजामाच्या ताब्यातून मराठवाड्याचा भूभाग मिळविण्यासाठीच्या लढ्यात एक स्वातंत्र्य सैनिक शहीद झाल्याची परंपरा असलेल्या थेरला येथे १ जानेवारी रोजी शहीद सुनील राख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पाटोदा तालुका हा स्वातंत्र्य सैनिकांची भूमी म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील थेरला या गावाची ओळख वेगळी आहे. थोर स्वातंत्र्य सैनिक, राजकारण व समाजकारणातही वेगळी ओळख असलेल्या आश्रूबा राख यांचे हे गाव. १९६०-६१ मध्ये सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमुळे येथील शिक्षणाचा दर्जा चांगला राहिला. त्यामुळे आज येथील अनेक तरुण पोलीस, सैनिक, जिल्हा परिषद, सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरीस आहेत. भारतीय सेनेत कार्यरत असताना २००५ मध्ये येथील सुनील राख यांना वीरमरण आले. १६ व्या पुण्यस्मरणनिमित्त बाळासाहेब राख, विनोद राख यांनी पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली. यावेळी राजू गायकवाड, बबन राख, गहिनीनाथ राख, सुरेश राख, गणेश राख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.