२१ गावांत स्वच्छता अभियानानंतर शिवरायांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:03 AM2021-02-21T05:03:17+5:302021-02-21T05:03:17+5:30
गेवराई : तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटात बी. एम. प्रतिष्ठाणच्या वतीने २१ गावांत जाऊन स्वच्छता अभियान राबविल्यानंतर गोंदी येथे ...
गेवराई : तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटात बी. एम. प्रतिष्ठाणच्या वतीने २१ गावांत जाऊन स्वच्छता अभियान राबविल्यानंतर गोंदी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच भगवा ध्वज मिरवणूक काढून जयंती उत्साहात साजरी करून उत्सवाची सांगता झाली.
६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान रेवकी गटातील मन्यारवाडी, गोविंदवाडी, ढोक वडगाव, पांढरवाडी, बागपिंपळगाव, बेलगाव, म्हाळस पिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, आगरनांदूर, नागझरी, विठ्ठलनगर, बागपिंपळगाव कॅम्प, दैठण, कटचिंचोली, लुखामसला, गोंदी, हिंगणगाव, संगम जळगाव, रेवकी, देवकी, कोल्हेर या २१ गावांत रात्री मुक्कामी राहून व सकाळी उठल्यावर तेथील शाळा, मंदिर, सार्वजनिक ठिकाण, रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमामध्ये युवक, तरुण, ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदानातून गावस्वच्छतेला हातभार लावला. तर या गावातून एकाच गावात जयंतीदिनी शिवरायांना अभिवादन करून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चिठ्ठ्या टाकून यामधील एक चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये गोंदी येथील चिठ्ठी निघल्याने शुक्रवारी भव्य असा भगवान ध्वज गावातून मिरवून छत्रपती शिवरायांना अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने अभिवादन करण्यात आले.
शिवरायांची मूर्ती भेट
शिवजयंती साजरी केल्यानंतर गोंदी गावाला शिवरायांची भव्य मूर्ती भेट देऊन ती येथील मंदिरात ठेवण्यात आली. तसेच स्वच्छता अभियानातील पहिल्या पांढरवाडी, कटचिंचोली व कोल्हेर या तीन ग्रामपंचायतींचा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छ गाव मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
===Photopath===
200221\sakharam shinde_img-20210220-wa0017_14.jpg