सराफा दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:47 PM2019-08-04T23:47:30+5:302019-08-04T23:48:07+5:30
तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून जवळपास १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही स्टोरेज डिव्हाईसच पळवले आहे.
बीड : तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून जवळपास १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही स्टोरेज डिव्हाईसच पळवले आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील मिथुन वसंत चिंतामणी यांचे सोन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानापुढील गेट तोडून त्यानंतर शेटरचे कु लूप तोडले व चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिन्यांसह १२ लाख २७ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. परंतु चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्हीचे व्हिडिओ रेकॉर्डर देखील चोरुन नेले आहे. या घटनेची माहिती मिळाताच उपविभागीय पोलीस अधीक्षक भास्कर सावंत, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. सुजीत बडे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी, श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. तसेच परिसरात पाहणी करुन चौकशी व पाहणी केली. दरम्यान श्वान पथक व परिसरातील इतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोºया वाढल्या : पोलीस प्रशासनास चोरट्यांचे आव्हान
जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, मागील अनेक दिवसांपासून चोºया व दरोड्याचे प्रमाण वाढले आहे.
यासंदर्भात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, चोºयाचे प्रमाण वाढल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी- नागरिकांमधून होत आहे.
सोन्याच्या दुकानात चोरी करुन चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही व्हिडीओ रेकॉर्डर चोरुन नेले आहे. त्यामुळे चोरट्यांचा शोध हे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
पोलिसांना माहिती कळाल्यानंतर श्वानपथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या माध्यमातून देखील चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.