गटविकास अधिकारी पोहोचले मेहकरी तलावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:28 AM2019-03-21T00:28:11+5:302019-03-21T00:28:46+5:30

आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले.

The Group Development Officer reached Mehakari Lake | गटविकास अधिकारी पोहोचले मेहकरी तलावावर

गटविकास अधिकारी पोहोचले मेहकरी तलावावर

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय टँकरने शेततळ्याला पाणीपुरवठा : चौकशीनंतर बजावली ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस

कडा :आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. याबाबत लोकमतने बुधवारच्या अंकात ‘शासकीय टँकरने शेततळ्याला पाणीपुरवठा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच बुधवारी सकाळपासून गटविकास अधिकारी मेहकरी तलावावर चौकशीसाठी जाऊन आले. अखेर नागरिकांना पिण्याऐवजी शेततळ्याला पाणी देणाऱ्या त्या टँकरचा शोध लावत संबंधित ग्रामसेवकाला नोटीस बजावली. आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील हिवरा रोडलगत असलेल्या गाडे वस्तीकडे जाणारे एक टॅँकर चक्क शेततलावात पाणी सोडताना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिसून आले. सदर टॅँकर शासकीय पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील पंचायत समितीचे होते. ही बाब चर्चेत आल्यानंतर खळबळ उडाली.
लोकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेले टँकर अशा प्रकारे आर्थिक हितसंबंध ठेऊन दिशाभूल करत आहेत. गावोगाव खेपा वेळेवर होत नाहीत असे प्रकार घडत असल्याबाबत लोकमतने वृत्त दिले होते.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित टॅँकरचालक आणि पाठबळ देणाºया अधिकाºयावर कारवाईच मागणी या वृत्तामध्ये करण्यात आली होती. हे वृत्त प्रकाशित होताच बुधवारी गटविकास अधिकारी मेहकरी येथील उद्भवाच्या ठिकाणी जाऊन आले.
बिघाड झाल्याने चालकाने पाणी सोडले
मंगळवारी हिवरा रोड लगत एका शेततलावात शासकीय टँकरने पाणी टाकल्याची बातमी प्रकाशित होताच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर चौकशी केली. अखेर तपास लावत तो टँकर सावरगाव येथे पाणी पुरवठा करत असून बिघाड झाल्याने चालकाने पाणी सोडल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. त्यामुळे नोटीस देऊन अधिकारी परत आले.
या प्रकरणात केवळ नोटीस न बजावता कारवाई करावी नसता उपोषणाला बसणार असल्याचे दादासाहेब गव्हाणे यांनी सांगितले.

Web Title: The Group Development Officer reached Mehakari Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.