वरिष्ठ सत्र न्यायालय पाटोदा येथे होण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालणार - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:56+5:302021-03-10T04:32:56+5:30

आप्पासाहेब राख म्हणाले, पाटोदा येथे उपविभागीय कार्यालय आहे. भौगोलिकदृष्ट्या हे मध्य ठिकाण म्हणून पाटोदा हेच योग्य राहील. तसेच २००८ ...

The Guardian Minister will be summoned to the Senior Sessions Court at Patoda - A | वरिष्ठ सत्र न्यायालय पाटोदा येथे होण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालणार - A

वरिष्ठ सत्र न्यायालय पाटोदा येथे होण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालणार - A

googlenewsNext

आप्पासाहेब राख म्हणाले, पाटोदा येथे उपविभागीय कार्यालय आहे. भौगोलिकदृष्ट्या हे मध्य ठिकाण म्हणून पाटोदा हेच योग्य राहील. तसेच २००८ पासून वकील संघ कै. भीमराव जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या संमतीने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व संबंधित मंत्री यांच्याकडे रीतसर ठराव सुद्धा देण्यात आलेला आहे. आताही पाटोदा वकील संघाच्या वतीने ठराव घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी सत्र न्यायालय होणे हे पाटोदा शिरूरच्या जनतेचा भावनेचा विषय आहे. या सर्व बाबीची दखल घेता वरिष्ठ सत्र न्यायालय पाटोदा येथे होणे संयुक्तिक राहील.

पाटोदा व तालुक्यातील तसेच शिरूर आष्टी यांच्या दृष्टीनेही हे मध्ये ठिकाण आणि पाटोद्याच्या विकास कार्यात आणखी एक पाऊल पुढे म्हणून हे न्यायालय येथे होणे आवश्यक असल्याचे मत पाटोदा तालुकावासीयांचे आहे.

यासंदर्भात पाटोदा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षीय समिती ही पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रसंगी मुंबई येथे जाऊन भेट घेईल. पाटोद्याच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात चर्चा करून वरिष्ठ स्तर सत्र न्यायालय पाटोदा येथेच व्हावे यासाठी आग्रहाची मागणी करण्यात येणार असल्याचे आप्पासाहेब राख यांनी सांगितले.

Web Title: The Guardian Minister will be summoned to the Senior Sessions Court at Patoda - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.