किशोरवयीन मुला-मुलींना प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:23+5:302021-01-17T04:28:23+5:30
१५ ते १९ या वयोगटांतील मुलांना व मुलींना किशोरवयीन समजले जाते. हे वय असे असते की, आपण करत असलेल्या ...
१५ ते १९ या वयोगटांतील मुलांना व मुलींना किशोरवयीन समजले जाते. हे वय असे असते की, आपण करत असलेल्या चुकांचे परिणाम त्यांच्या लक्षात येत नाही. यातून मोठे भरून न निघणारे नुकसान होत असते. नेमके हेच टाळण्यासाठी व बालविवाह आणि त्याचे परिणाम याबद्दल डॉ.अशोक गवळी, वाघुलकर एस. बी., ढाकणे बी.जे. व जोगदंड एस.आर. यांनी मार्गदर्शन केले.
बालविवाह टाळणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. स्वच्छतेबाबतही सूचना देण्यात आल्या.
आकर्षणापोटी प्रलोभन, आमिष दाखवत एकमेकांना किशोरवयीन बोलत असतात. प्रामुख्याने यातून व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका असतो. मात्र, हे या वयात लक्षात येत नाही. धूम्रपान, मद्यपानाच्या आहारी जातात व दुसऱ्यालाही प्रवृत्त केले जात असते. अशा वेळी किशोरवयीन मुलींनी नाही म्हणण्याचे धाडस केले पाहिजे. किशोरवयीन गर्भारपण शारीरिकदृष्ट्या विपरित परिणामकारक ठरते. याबरोबर भ्रूणहत्या, स्त्रियावरील हल्ला, ऑनर किलिंग, जबरदस्ती बालविवाह, लग्नासाठी अपहरण, घरगुती हिंसा, घालून पाडून बोलणे, मारझोड करणे, शोषण, अत्याचाराचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर व प्रगतीवर होत असल्याचे सांगण्यात आले.