शेतीशाळेत हरभरा पिकावर मार्गदर्शन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:22 AM2021-02-19T04:22:50+5:302021-02-19T04:22:50+5:30

जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव मडके, तालुका कृषी अधिकारी ...

Guidance on gram crop in agriculture - A | शेतीशाळेत हरभरा पिकावर मार्गदर्शन - A

शेतीशाळेत हरभरा पिकावर मार्गदर्शन - A

Next

जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव मडके, तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे, प्रकल्प सहाय्यक अतिश चाटे व समन्वयक रामेश्वर चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळेचे आयोजन केले होते. यावेळी मागील पाच शेती शाळेमध्ये घेतलेल्या तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षक अमोल राठोड बोलताना म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी शेती शाळेतील तंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्यांना कमी खर्च लागला आहे. बीजप्रक्रिया करणे, पक्षी थांबे उभारणे, योग्यवेळी शेंडे खुडणे, पिवळे व निळे चिकट सापळे लावणे,कामगंध सापळे लावणे, ५ टक्के निंबोळी अर्क फवारणे, बरेच शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अवलंब केला त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये पीक हातात आले. तसेच अनावश्यक फवारणीचा खर्चही टळले. पुढील हंगामातही शेतकऱ्यांनी याच तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन राठोड यांनी केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले मनोगत मांडले. ५ टक्के निंबोळी अर्क घरीच बनवून फवारल्याने माझा रासायनिक फवारणीचा खर्च कमी झाला, असा अनुभव व्यंकटेश देशमुख या प्रगतशील तरुण शेतकऱ्याने सांगितला. यावेळी कृषी सहाय्यक स्वामी,समूह सहाय्यक महादेव कणसे, सरपंच सूर्यकांत साळुंके, व जीवराज देशमुख, अशोक देशमुख, रमेश काचगुंडे, मोबीन शेख, अशोक काळे, अश्रुबा काजगुंडे व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Guidance on gram crop in agriculture - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.