माजलगावात पकडला १४ लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:49 AM2018-11-11T00:49:12+5:302018-11-11T00:50:07+5:30
शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्या बबलू सिद्दिकी व त्याच्या साथीदारांनी बायपास जवळ नातेवाईकाच्या घरी लपवून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून तब्बल १४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्या बबलू सिद्दिकी व त्याच्या साथीदारांनी बायपास जवळ नातेवाईकाच्या घरी लपवून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून तब्बल १४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने केली.
सदरील गुटखा हा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अन्न व प्रशासनाच्या अधिकाºयांना याबाबत माहिती दिली असून त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. बबलू सिद्दिकी व त्याच्या साथीदारांनी मात्र घटनास्थळावरून पळ काढला. यातील ममताजोद्दीन काझी याला ताब्यात घेतले असून बबलू अद्यापही फरार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक एस.एस.बिराजदार, जाँन्टी कांबळे हजर होते. तपास बिराजदार हे करीत आहेत.