महामार्गावर पकडला ३० लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:58 PM2019-12-03T23:58:27+5:302019-12-03T23:58:58+5:30
दिल्ली येथून कर्नाटक राज्यात गुटखा घेऊन जाणारा दहा चाकी ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर पकडला. वाहतूक विभागाचे सपोनि प्रविणकुमार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
गेवराई : दिल्ली येथून कर्नाटक राज्यात गुटखा घेऊन जाणारा दहा चाकी ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर पकडला. वाहतूक विभागाचे सपोनि प्रविणकुमार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. ट्रकसह गुटखा असा मिळून जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मंगळवारी दुपारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
दिल्ली येथून कर्नाटक राज्यातील हुबळी येथे दहा चाकी ट्रक (एच.आर. ५५ ए.ई. ०८०६) मधून सुपारी व जर्दा पत्ती हा माल पँकिंग करण्यासाठी चालला होता. मंगळवारी पहाटे गढी येथील महामार्ग ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविणकुमार बांगर व त्यांचे कर्मचारी पाडळसिंगी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. तपासणीदरम्यान सदर ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा जास्त लोड दिसल्याचे लक्षात आले. या ट्रकची तपासणी करताना पोलिसांना संपूर्ण ट्रकमध्ये भरलेल्या पोत्यावरु न संशय आला. त्यानुसार सदरील ट्रकची तपासणी केली असता विविध कंपनीच्या पंख्यांचे बॉक्सवर ठेवलेले होते. त्याखालोखाल पोत्यांनी माल भरलेला होता. यामध्ये सर्व पोत्यात सुपारीचे मटेरियल व तंबाखू, जर्दाचे पोते (प्रतिबंधित) आढळून आले. त्यामुळे हा ट्रक ताब्यात घेऊन गेवराई पोलिस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होती.
प्रतिबंधित पान मटेरियल
गुटखा घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेतल्यानंतर प्रविणकुमार बांगर यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला ही माहिती दिली. यानंतर या विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी गेवराई येथे येऊन सदर ट्रकची पाहणी करु न पंचनामा केला. त्यानुसार ट्रकमध्ये जवळपास ३० लाख रुपये किंमतीचे प्रतबंधित पान मटेरियल असल्याचे अनिकेत भिसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दीड वर्षात चौथी मोठी कारवाई
दरम्यान यापूर्वी देखील गेवराई जवळ ३० लाख, तसेच पाडळसिंगी येथेच ४५ लाख रुपयांचा गुटखा जप्तीच्या दोन कारवाया पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने केल्या होत्या. त्यातच मंगळवारी पुन्हा कारवाई झाल्याने या महामार्गावरु न गुटख्याची तस्करी सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड वर्षातील ही चौथी मोठी कारवाई असून या कारवाईने गुटखा विक्र ेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.