दोन लाखांचा गुटखा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:04 AM2019-07-27T00:04:08+5:302019-07-27T00:05:07+5:30

शहरातील बार्शी नाका परिसरात गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गुटखा घेऊन जाणाऱ्या छोट्या टेंपोवर कारवाई करण्यात आली. यावेळी २ लाख १९ हजार रुपयांच्या गुटख्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.

Gutkha seized in two lakhs; Four have been charged in the crime | दोन लाखांचा गुटखा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

दोन लाखांचा गुटखा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देगाडी जप्त : गस्तीवरील पोलिसांची कारवाई

बीड : शहरातील बार्शी नाका परिसरात गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गुटखा घेऊन जाणाऱ्या छोट्या टेंपोवर कारवाई करण्यात आली. यावेळी २ लाख १९ हजार रुपयांच्या गुटख्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.
पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलीस निरीक्षक राजीव तळेकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गस्तीवर होते. रात्रीचे साडेआकरा वाजण्याच्या सुमारास एक छोटा टेंपो संशयास्पद वाटल्यामुळे त्याला अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र, चालकाने गाडी पळवली मधील एका मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी गाडीचा पाठलाग करुन चालकासह अन्य तिघांना ताब्यात घेतले व गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये राजनिवास पान मसाला व जाफराणी जर्दा नावाचा बंदी असलेला गुटखा आढळून आला. याप्रकरणी गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजीव तळेकर, पोह. उबाळे, पोशि काकडे व चालक सफी सोडगिरी यांनी केली.
पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे हे प्रकरण दिले. त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.दाभाडे यांनी तसेच अनिकेत भिसे व मरेवार यांनी पुढील कारवाई केली. अधिकारी अनिकेत भिसे यांच्या फिर्यादीवरुन पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये बीड शहरातील मोठे गुटखा माफिया सामील असल्याची चर्चा असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
गुटखा वाहतूक महामार्ग
पोलिसांच्या कृपेने ?
बीड शहरात येणारा गुटखा तसेच बीडमधून इतर जिल्ह्यात होणारी गुटख्याची वाहतूक ही महामार्ग पोलिसांच्या कृपेने होत असल्याची माहिती आहे. तसेच यामध्ये मोठे अर्थकारण असून मोठा व्यावहार होत असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यादृष्टीने चौकशी करण्याची देखील मागणी होत आहे.
आरोपी राजस्थानमधील
गुटखा वाहतूक करताना पोलिसांनी पकडलेले सिमू सावताराम मेगवान, मनीराम चिनाराम मेगवान, कमलकिशोर मेगवान हे सर्व राहणार फियाबाज, जिल्हा नागौर, राजस्थान येथील रहिवासी आहेत. हे विविध कामासाठी बीड शहरात आलेले आहेत.
या सर्वांचा हल्ली मुक्काम शहरातील गांधीनगरात आहे. यांच्यासोबत याठिकाणी राहणारा शरद भिमराव धोंगड या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha seized in two lakhs; Four have been charged in the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.