स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी स्वतःच्या मुलीस रुग्णालयात दाखल करून केले सीझर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:23 AM2021-07-18T04:23:56+5:302021-07-18T04:23:56+5:30

दीपक नाईकवाडे केज : केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जात असल्याने तालुक्यातील ...

The gynecologist admitted his daughter to the hospital and performed Caesar - A | स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी स्वतःच्या मुलीस रुग्णालयात दाखल करून केले सीझर - A

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी स्वतःच्या मुलीस रुग्णालयात दाखल करून केले सीझर - A

Next

दीपक नाईकवाडे

केज : केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जात असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना याची खात्री व्हावी, यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या पित्याने माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या स्वतःच्या मुलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून तिचे स्वतः सिझर केले. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर दर्जेदार उपचार केले जात असल्याचे दाखवून दिले. केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा पदभार डॉ. संजय राऊत यांनी घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा सुधारत आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या जाऊ लागल्या आहेत. रुग्णालयात काम करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णाच्या सेवेत अविरत कार्यरत आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करीत असल्याचे चित्र उपजिल्हा रुग्णालयात दिसून आले.

केजच्या उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब चाळक यांची कन्या पल्लवी दीपक पवार ही पहिल्या बाळंतपणासाठी कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथून माहेरी केज येथे वडिलांकडे आली होती. वडिलांचे केज शहरात सर्व सुविधा असलेले खासगी रुग्णालयही आहे. तेथे मुलीचे बाळंतपण न करता ज्या उपजिल्हा रुग्णालयात आपण रुग्णांवर उपचार करतो, त्याच उपजिल्हा रुग्णालयात डॉ. भाऊसाहेब चाळक यांनी बाळंतपणासाठी मुलीला दाखल केले. स्वतः तिचे सिझरही करीत उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार सुविधा दिल्या जात असल्याचे दाखवून दिले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. इंगोले, डॉ. सोळंके, डॉ. मुंडे, डॉ. दत्तात्रय चाटे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिक आरकडे, गायकवाड, इंगळे ब्रदर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकृष्ण नागरगोजे यांच्यासह शेख नासेर व परमेश्वर राऊत या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर दर्जेदार उपचार करण्यात येतात. त्यामुळे मी माझ्या मुलीलाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून तिचे स्वतः सिझर केले. उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब चाळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

--------

160721\0811img-20210716-wa0025.jpg

केज उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ भाऊसाहेब चाळक यांनी स्वतःच्या मुलीचे केज उपजिल्हा रुग्णालयात सिझर केले यावेळी रुग्णालयातील डॉ इंगोले ,डॉ सोळंके ,डॉ मुंडे ,डॉ दत्तात्रय चाटे ,रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय राऊत ,यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिक आरकडे ,गायकवाड ,इंगळे ब्रदर ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकृष्ण नागरगोजे आदी.

Web Title: The gynecologist admitted his daughter to the hospital and performed Caesar - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.