बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान
By शिरीष शिंदे | Updated: April 11, 2024 18:25 IST2024-04-11T18:24:25+5:302024-04-11T18:25:48+5:30
धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्याने मोठे नुकसान झाले आहे

बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान
बीड: जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण होते परंतु दुपारी तीन ते चार या वेळेत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपिट उडली परंतु या पावसामुळे वातावरण थंडावा निर्माण झाल्याने थोडासा दिलासा मिळाला. गेवराई तालुक्यात झालेल्या अवकाळी पावस व वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळुन पडली तर काही ठिकाणचे नुकसान झाले.
बीड जिल्ह्यात तूफान गारपीट; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान #beed#rainpic.twitter.com/hY8lG69N0U
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 11, 2024
धारुर-वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ येथे मोठे झाड पडल्याने काही वेळ वाहतुक बंद होती. उन्हाळी ज्वारी व बाजरीचे सुद्धा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. बीड शहरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा पाऊस झाला परंतु नोंद घ्यावी असा पाऊस झाला नाही.