बसमध्ये राहिलेली दीड लाखाची रक्कम चालक-वाहकाने केली परत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:19 PM2018-10-31T17:19:50+5:302018-10-31T17:21:05+5:30

परळी आगारातुन बीडकडे निघालेल्या बसमध्ये एका प्रवाशाची 1 लाख 40 हजार रक्कम असलेली पिशवी विसरली होती.

Half of the amount of money left on the bus was made by driver-carrier | बसमध्ये राहिलेली दीड लाखाची रक्कम चालक-वाहकाने केली परत  

बसमध्ये राहिलेली दीड लाखाची रक्कम चालक-वाहकाने केली परत  

googlenewsNext

परळी (बीड ) : परळी आगारातुन बीडकडे निघालेल्या बसमध्ये एका प्रवाशाची 1 लाख 40 हजार रक्कम असलेली पिशवी विसरली. हे बस वाहकास निदर्शनास येताच त्याने चालकाच्या मदतीने ती रक्कम संबंधित प्रवाशाला परत केली. बस वाहक विश्‍वनाथ गित्ते व चालक जी.एम.सानप यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आगार प्रमुख आर. बी. राजपुत व उपनगराध्यक्ष आयुब पठाण यांनी त्यांचे आज दुपारी स्वागत केले. 

बीड येथील बालेपीर भागातील सय्यद पाशामियाँ हे त्यांचे परळीतील जावाई नसीर काजी यांच्याकडे आले होते. परळीत प्लॉट घेण्यासाठी त्यांनी 1 लाख 40 हजार रुपये आणले होते. परंतु प्लॉट न घेतला ती रक्कम घेऊन बुधवारी सकाळी परळी-बीड एम.एच.20 बी.टू.2028 या क्रमांकाच्या बसने बीडकडे निघाले बीडच्या बसस्थानकात उत्तरल्यास बसमध्ये पैशाची पिशवी राहिल्याचे लक्षात आले. पुन्हा बसमध्ये चढुन पहिले असता. त्यांना पिशवी दिसली नाही. बीडच्या एसटी कंट्रोलरला माहिती देण्यात आली. दरम्यान बीडहुन बस परळीकडे येण्यास निघाली असता. बस वाहकाचे लक्ष बसमधील पिशवीकडे गेले. पिशवी उघडुन पाहिली असता त्यामध्ये 1 लाख 40 हजाराची रक्कम आढळुन आली. ती रक्कम परळीत आल्यानंतर सय्यद पाशामियाँ यांचे जवाई नसीर काजी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी त्यांचे इतर नातेवाईक उपस्थित होते. 

बस वाहक विश्‍वनाथ गित्ते ( रा.नंदागौळ) व चालक जी.एम.सानप यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल एस.टी.महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांचे कौतुक केले आहे. आगार प्रमुख आर.बी.राजपुत, उपनगराध्यक्ष आयुब पठाण, राजाभाऊ ठोंबरे, रमेश गित्ते, उत्तम मोरे, उमाकांत मुंडे, मनोज बेंबळगे, आर.एन.गित्ते, सचिन राठोड, कुणाल गोदाम यांच्यासह इतरांनी गित्ते व सानप यांचे स्वागत केले. 

Web Title: Half of the amount of money left on the bus was made by driver-carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.