हलगर्जी अंगलट; घरी बसून कारभार पाहणाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:51+5:302021-06-16T04:44:51+5:30

लोकमत इम्पॅक्ट बीड : कोरोना वॉर्डमधील ऑक्सिजन खाटांचे नियोजन आाणि गंभीर व अतिगंभीर रुग्णांची व्यवस्था करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असतानाही ...

Halgarji Anglat; Notice to those sitting at home | हलगर्जी अंगलट; घरी बसून कारभार पाहणाऱ्यांना नोटीस

हलगर्जी अंगलट; घरी बसून कारभार पाहणाऱ्यांना नोटीस

googlenewsNext

लोकमत इम्पॅक्ट

बीड : कोरोना वॉर्डमधील ऑक्सिजन खाटांचे नियोजन आाणि गंभीर व अतिगंभीर रुग्णांची व्यवस्था करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असतानाही काही कर्मचारी घरीच बसून कारभार पाहत होते. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला होता. आता या कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयात अतिगंभीर रुग्ण वॉर्ड क्रमांक ५ व १, आयसीयू १ आणि निगेटिव्ह रुग्ण वॉर्ड क्रमांक २ मध्ये दाखल करण्यासह त्यांना वेळेवर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासह त्यांना त्याच वॉर्डमध्ये दाखल करणे, त्यांना बायपॅप, व्हेंटिलेटर लावणे, ५ लीटरपेक्षा कमी ऑक्सिजन लागत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करणे, तसेच ऑक्सिजन वाया जाणार नाही, याचे नियोजन करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली. एका पथकात एका डॉक्टरसह तीन कर्मचारी नियुक्त केले. परंतु हे कर्मचारी केवळ हजेरी लावून गायब होत असल्याचे रविवारी ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून उघड झाले होते. सनियंत्रण अधिकारी डॉ. राम देशपांडे यांनीही हजेरी घेतली असता हे सर्व लोक गैरहजर असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, लोकमतने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना या सर्वांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे डॉ. राठोड यांनी पथक क्रमांक पाच लोकांना नोटीस बजावल्या आहेत. डॉ. देशपांडे यांनीही त्यांच्या गैरहजेरीचा अहवाल दिलेला आहे. असे असतानाही आता डॉ. राठोड काय कारवाई करतात, हे दोन दिवसानंतर समजणार आहे.

---

मूळ ठिकाणी परत पाठवा

आता कोरोना कमी झाला आहे. त्यातही हे सर्व लोक ऑक्सिजनचे नियोजन न करता फोनवरूनच कारभार हाकतात. या लोकांची रुग्णांना अथवा प्रशासनाला कसलीही मदत होत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या सर्व लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवून काम करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

--

कामात हलगर्जी बिलकूल खपवून घेतला जाणार नाही. जे लोक घरून कारभार पाहत होते, त्या सर्वांना नोटीस काढल्या आहेत. तसेच या सर्वांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत करून काम करण्याचे आदेश दिले जातील.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

===Photopath===

150621\15_2_bed_16_15062021_14.jpeg

===Caption===

लोकमतने १४ जून रोजी प्रकाशित केलेले वृत्त.

Web Title: Halgarji Anglat; Notice to those sitting at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.