पीठासन अधिकाऱ्यांसमोर नगरसेवकांच्या नातेवाईकांची हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:50+5:302021-01-23T04:34:50+5:30

माजलगाव : नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड शुक्रवारी बिनविरोध झाली. दरम्यान, या निवडीपूर्वी सभागृहात पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी श्रीकांत ...

Hamritumari of the relatives of the corporators in front of the presiding officer | पीठासन अधिकाऱ्यांसमोर नगरसेवकांच्या नातेवाईकांची हमरीतुमरी

पीठासन अधिकाऱ्यांसमोर नगरसेवकांच्या नातेवाईकांची हमरीतुमरी

Next

माजलगाव : नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड शुक्रवारी बिनविरोध झाली. दरम्यान, या निवडीपूर्वी सभागृहात पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्यासमोर भाजप नगरसेवकांच्या नातेवाईकांत हमरीतुमरी झाली. मुख्याधिकाऱ्यांंनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.

शिक्षण सभापतीपदी चाऊस गटाचे सय्यद राज अहमद, महिला व बालकल्याण सभापतीपदी जगताप गटाच्या उषा बनसोडे, तर स्वच्छता सभापतीपदी भाजपाच्या उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांची निवड जवळपास निश्चित झाली होती. दरम्यान, अत्यंत ओढाताणीत जगताप गटाच्या शरद यादव यांनी पाणीपुरवठा सभापतीपद हस्तगत केले. तर बांधकाम सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे रोहन घाडगे व जनविकास आघाडीचे तौफिक पटेल यांच्यात चढाओढ दिसून आली होती. यात राष्ट्रवादीच्या रोहन घाडगे यांनी बाजी मारली. तर नियोजन सभापतीपदी अशोक आळणे यांची निवड झाली. दरम्यान, स्थायी समितीच्या निवडी गदारोळात पार पडल्या. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी समझोता करून तालेब चाऊस, भागवत भोसले व स्वाती सचिन डोंगरे यांच्या नावांना पुढे केल्याने स्थायी समितीमध्ये त्यांची वर्णी लागली. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे सभागृहांमध्ये महिला नगरसेवकांची उपस्थित अत्यल्प होती.

पोलीस बंदोबस्त नसल्याने वाद चिघळला

नगरसेवकांंच्या नातेवाईकांत वाद झाल्यानंतर महिला नगरसेविका सभागृहात येताना दिसत होत्या. यावेळी समितीच्‍या वादातून भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांत हमरीतुमरीच्यावेळी नगराध्यक्ष शेख मंजूर बाहेर निघून गेले. तर मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी मध्यस्थी करीत सभागृहातील वातावरण शांत केले. यामुळे मोठी घटना टळली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असता तर हा वाद निर्माण झाला नसता.

आ. सोळंके यांचा आदेश डावलला

समित्या जाहीर करण्यापूर्वी आ. सोळंके यांच्या निवासस्थानी नगरसेवकांची बैठक घेतली होती. यावेळी आ. सोळंकेंच्या सूचनेवरून कोणाला कोणत्या विशेष समित्या द्याव्यात असे ठरले होते. परंतु, नगरसेवकांनी सभागृहात येताच वाद घालून समित्या हस्तगत करण्यासाठी गदारोळ केला. यात शरद यादव यांनी आपली पोळी भाजत शेवटपर्यंत नाव नसताना पाणीपुरवठा सभापतीपद मिळविले.

Web Title: Hamritumari of the relatives of the corporators in front of the presiding officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.