हातपंप दुरुस्ती होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:51+5:302021-07-31T04:33:51+5:30
केबलचोरीने वैताग अंबाजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी सोडण्यात ...
केबलचोरीने वैताग
अंबाजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालविण्यासाठी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
घरगुती गॅसचा गैरवापर
बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते. असे प्रकार वाढले आहेत.
अवैध धंदे फोफावले
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देऊन यावर नियंत्रण आणण्याची मागणी आहे.
गतिरोधकाची दुरवस्था
बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा या सपाट झालेल्या गतिरोधकामुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करीत आहेत.