खात्यातील पैसे सांभाळा; सायबर क्राइममध्ये वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:44+5:302021-09-21T04:37:44+5:30
बीड : बक्षीस, लॉटरीचे आमिष दाखवून तुम्हाला कोणाचा फोन आला तर अजिबात माहिती देऊ नका... कुठल्याही परिस्थितीत एटीएम पिन, ...
बीड : बक्षीस, लॉटरीचे आमिष दाखवून तुम्हाला कोणाचा फोन आला तर अजिबात माहिती देऊ नका... कुठल्याही परिस्थितीत एटीएम पिन, खात्याविषयीचा गोपनीय तपशील तसेच ओटीपी कोणाला सांगू नका, अन्यथा तुमचे खाते क्षणात रिकामे होऊ शकते.
जिल्ह्यात सायबर क्राइममध्ये झालेली वाढ हाच धोक्याचा इशारा देत आहे. सायबर भामट्यांच्या बोलण्याला भुलून कुठलीही माहिती शेअर केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खबरदारीचे आवाहन सायबर सेलने केले आहे.
....
सायबर क्राइम वाढतोय...
वर्ष गुन्हे
२०२० - ७८
२०२१ - ८३
...
२०२१ मधील सोशल मीडिया क्राइम
फेसबुक ०३
इन्स्टाग्राम ०१
व्हॉट्सॲप ०१
यू-ट्युब- ००
......
आरोपी सापडेनात, तपास रखडले
सायबर क्राइमचे धागेदोरे थेट नोएडा, कोलकाता व झारखंडमधील जामतारा येथे आढळून आले आहेत. बीडच्या सायबर सेलने एटीएम क्लोनिंग करणारी टोळी शिर्डीतून पकडली होती. मात्र, उर्वरित गुन्ह्यांचे
तपास आरोपी सापडत नसल्याने रखडलेलेच आहेत.
...