हनुमान महाराज अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:11+5:302021-08-27T04:36:11+5:30

गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे यांना अखेर सहा महिन्यांनंतर अटक करण्यात २६ ऑगस्ट ...

Hanuman Maharaj finally arrested | हनुमान महाराज अखेर जेरबंद

हनुमान महाराज अखेर जेरबंद

Next

गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे यांना अखेर सहा महिन्यांनंतर अटक करण्यात २६ ऑगस्ट रोजी पोलिसांना यश आले. औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

गेवराई तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने हनुमान महाराजांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावरून ४ फेब्रुवारी २०२१ रोजी चकलांबा ठाण्यात त्यांच्याविरुद्ध विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. ३० व ३१ जानेवारी रोजी जेवणासाठी घरी आलेल्या हनुमान महाराजांनी अश्लील संवाद साधून विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीने केला हाेता. गुन्हा नोंद झाल्यापासून हनुमान महाराज फरार होते. दरम्यान, त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. २१ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयानेही हनुमान महाराज यांना जामीन देण्यास नकार देत अर्ज फेटाळला. त्यामुळे हनुमान महाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती.

....

परजिल्ह्यात पोबारा करण्याचा होता डाव

दरम्यान, खंडपीठाने जामीन नाकारल्याने हनुमान महाराज यांनी पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी परजिल्ह्यात पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ते गेवराईमार्गे निघाले होते. मात्र, ते पळून जात असल्याची कुणकुण लागताच उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी पथक रवाना केले. शहराजवळ त्यांना ताब्यात घेतले गेले.

...

आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ

दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार झालेल्या हनुमान महाराजांनी दुसऱ्या दिवशी सर्व आरोप फेटाळून लावले होते. निर्जनस्थळी एका बाभबळीच्या झाडाखाली बसून आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. चिठ्ठीत १० ते १२ जणांची नावे होती, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, शोध घेऊनही महाराज सापडले नव्हते.

...

260821\26bed_11_26082021_14.jpg

हनुमान महाराज

Web Title: Hanuman Maharaj finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.