हनुमान महाराजांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:02+5:302021-08-23T04:36:02+5:30

बीड: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा आरोप असलेल्या कोळगाव (ता. गेवराई) येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे यांच्या अडचणी वाढण्याची ...

Hanuman Maharaj's bail application rejected by High Court | हनुमान महाराजांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

हनुमान महाराजांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

Next

बीड: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा आरोप असलेल्या कोळगाव (ता. गेवराई) येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. मात्र, २१ ऑगस्ट रोजी तो फेटाळण्यात आला. गेवराई तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून चकलांबा ठाण्यात ४ फेब्रुवारी रोजी

कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज यांच्यावर विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला होता. ३० व ३१ जानेवारी रोजी जेवणासाठी घरी आलेल्या महाराजांनी अश्लील संवाद साधून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद होते. दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यापासून महाराज फरार आहेत. त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर २१ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

----------------

आत्महत्येच्या प्रयत्नाने उडाली होती धावपळ

दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार झालेल्या हनुमान महाराजांनी ७ फेब्रुवारी रोजी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. शिवाय एक चिठ्ठीही त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. त्यात दहा जणांच्या नावांचा उल्लेख करून हा गुन्हा नोंदविण्यामागे त्यांचा हात असल्याचा दावा केला होता. आत्महत्या करत असल्याच्या व्हिडिओने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली होती.

....

चकलांबा पोलिसांचे अपयश

गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार झालेले हनुमान महाराज सहा महिन्यांपासून चकलांबा पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यांनी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतरही ते सापडू शकले नाहीत. त्यामुळे चकलांबा पोलिसांचे अपयश समोर आले आहे.

....

220821\22bed_11_22082021_14.jpg

हनुमान महाराज

Web Title: Hanuman Maharaj's bail application rejected by High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.