परळी नगरीत हर हर महादेवाचा गजर; वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:43 PM2018-08-27T17:43:49+5:302018-08-27T17:44:18+5:30
तिसर्या श्रावण सोमवारी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
परळी (बीड ) : तिसर्या श्रावण सोमवारी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. हर हर महादेवचा गजर करत भक्त वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी येत होते. यामुळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते.
रविवारपासुनच राज्यासह कर्नाटक, आंधप्रदेशातून भाविक शहरात दाखल झाले. यावेळी महिला भक्तांनी मुगाची शिवमुठ तर पुरुष भक्तांनी वैद्यनाथाला बिल्वपत्र वाहिले. दुपारी तिन वाजेपर्यंत दोन लाख भक्तांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थान सचिव राजेश देशमुख व विश्वस्त प्रा.प्रदिप देशमुख यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
श्रावणमास तपोनुष्ठानास गर्दी वाढली..
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे 82 वे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री विश्वेश्वर मंडप कार्यालयात चालु आहे. परमरहस्य ग्रंथ पारायणाच्या तिसर्या सत्रास रविवारी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ग्रंथ पारायणास येणार्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे.