अवेळी वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:29+5:302021-02-15T04:29:29+5:30

वन्य प्राण्यांचा धोका कायम रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध केल्यानंतर अंधारात चाचपडत शेतकऱ्यांना जागरण करीत शेतीला पाणी द्यावे लागते. रात्रीच्या ...

Harassment of farmers due to uninterrupted power supply - A | अवेळी वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण - A

अवेळी वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण - A

Next

वन्य प्राण्यांचा धोका कायम

रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध केल्यानंतर अंधारात चाचपडत शेतकऱ्यांना जागरण करीत शेतीला पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी व सरपटणारे प्राणी यांचा धोका पत्करून शेतीला पाणी द्यावे लागते. वन्यप्राण्यांमुळे व सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे अनेक अपघात आजपर्यंत घडलेले आहेत. तरीही महवितरण याची दखल घेत नाही.

रोहित्रासाठी शेतकऱ्यांनाच भुर्दंड

अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोहित्र अतिदाब आल्यामुळे निकामी होत आहेत. हे नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकरी स्वखर्चाने तालुक्याच्या ठिकाणी नेतात. पंधरा-पंधरा दिवस या रोहित्रांची दुरुस्ती होत नाही. दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणचे सिंचन रखडते. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील सिंचन धोक्यात आले आहे.

शासनाकडे रात्रीचा वीजपुरवठा बदलून दिवसा करण्यात यावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच निकामी रोहित्र लवकर दुरुस्त करण्यात येणार आहेत.

-संजय देशपांडे, सहायक अभियंता, महावितरण

Web Title: Harassment of farmers due to uninterrupted power supply - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.