मूल्यांकनाच्या ‘हार्ड कॉपी’ बोर्डाकडे; दहावीचा निकाल कधी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:23+5:302021-07-15T04:23:23+5:30

विद्यार्थी, पालकांना उत्सुकता : त्रुटींची दुरुस्ती लवकर झाली तरच निकाल वेळेवर बीड : दहावीचे मूल्यांकन करताना शाळांनी प्रचंड ...

To the ‘hard copy’ board of assessment; When will the result of X be? | मूल्यांकनाच्या ‘हार्ड कॉपी’ बोर्डाकडे; दहावीचा निकाल कधी लागणार?

मूल्यांकनाच्या ‘हार्ड कॉपी’ बोर्डाकडे; दहावीचा निकाल कधी लागणार?

googlenewsNext

विद्यार्थी, पालकांना उत्सुकता : त्रुटींची दुरुस्ती लवकर झाली तरच निकाल वेळेवर

बीड : दहावीचे मूल्यांकन करताना शाळांनी प्रचंड चुका ठेवल्या आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल लटकण्याची चिन्हे आहेत. बीड जिल्ह्यातील ७५२ शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ऑनलाइन नोंद करण्यात आली. तर या नोंदीच्या हार्ड कॉपी शिक्षण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय संपर्क करून हस्तगत केल्या आहेत; मात्र ज्या शाळांनी योग्यरीत्या मूल्यमापन प्रक्रिया पार पाडली त्या शाळांना मूल्यांकनात त्रुटी असणाऱ्या शाळांमुळे निकालासाठी वाट पाहावी लागणार आहे.

दहावीच्या गुणदान प्रक्रियेचा टप्पा पार पाडताना शिक्षकांसमोर अनेक अडचणी आल्या. नववीचे मूळ गुण, रूपांतरित गुण ५० टक्के आणि दहावीचे सराव, चाचणी, प्रथम सत्र किंवा सराव परीक्षा किंवा इतर परीक्षेतून मिळालेले गुण त्याचे ३० गुणांमध्ये रूपांतर. त्याचबरोबर दहावी अंतर्गत तोंडी परीक्षा भाषा विषयासाठी तसेच अंतर्गत मूल्यमापन सामाजिक शास्त्र आणि गणितासाठी तसेच विज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी असे २० गुण ठरवण्यात आले होते.

गुणदानाबाबत मुख्याध्यापक आणि तज्ज्ञांकडून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. शासन निर्णय आणि काम करताना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी या वेगळ्या होत्या. तरीही शिक्षकांनी रात्रंदिवस नववीचे अभिलेखे तपासून रूपांतरित गुण तसेच दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले. त्याचा गोषवारा ऑनलाइनद्वारे नमूद करण्यात आला होता. गुणदान केलेल्या हार्ड कॉपी बोर्डाकडे सोपविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांकडून ९९ टक्के माहिती शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून भरण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुख्याध्यापक म्हणतात...

२ जुलैपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणदान प्रक्रिया राबवून ऑनलाइन पाठवण्यात आली आहे. त्याच्या हार्ड कॉपी ६ तारखेनंतर बोर्डाकडे पोहोच झाल्या आहेत. - दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय.

ऑनलाइन डेमोद्वारे सचिवांचे मार्गदर्शन तसेच शिक्षणाधिकारी आणि तज्ज्ञ मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन मिळाल्याने गुणदानाबाबत सर्वकाही सुस्पष्टता होती. अडचणी आल्या नाहीत. - महादेव शेंडगे, मुख्याध्यापक द.बा. घुमरे पब्लिक स्कूल, बीड.

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी - ४०५८८

मुले - २२०३५

मुली - १८४२३

जिल्ह्यातील शाळा - ७५२

मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळा - ७५२

----

शिक्षण विभाग अनभिज्ञ

जिल्ह्यातील किती शाळांनी मूल्यांकन कळविले नाही, तसेच हार्ड कॉपी सादर केल्या नाहीत, याबाबतच्या माहितीबाबत स्थानिक शिक्षण विभाग अनभिज्ञ होते. ऑनलाइन गुणदानाच्या नोंदीची हार्ड कॉपी घेण्यासाठी संकलन केंद्र विभागून देण्यात आले होते. तेथून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हार्ड कॉपी हस्तगत केल्या. त्यामुळे शिक्षण विभागाला अधिकृतरीत्या कळू शकले नाही.

चुका सुधारण्यासाठी बोर्ड करणार संपर्क

गुणदान करताना नोंदीत गुणांचे रूपांतरित गुण, त्रुटींचे प्रस्ताव, येणाऱ्या तांत्रिक अडचणी, रिपीटर विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यांकन नसणे तसेच त्रुटींच्या दुरुस्तीला लागणारा वेळ यामुळे दहावीचा निकाल लांबणीवर पडू शकतो.

गुणदानाच्या हार्ड कॉपी घेऊन जाताना बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्रुटी निघाल्यास वैयक्तिक शाळांना संपर्क करून कळविणार असल्याचे सांगितले.

अडचणी आल्या नाहीत

गरज पडल्यास गुणदान प्रक्रियेबाबत संबंधित शाळांच्या समिती प्रमुखाला बोलावण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

बोर्डाकडून सुस्पष्ट सूचना असल्याने काहीही अडचणी आल्या नाहीत. मूल्यमापनाची बेरीज आपोआप सॉफ्टवेअरमध्ये नोंदीत होत असल्याने अडचणी आलेल्या नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

Web Title: To the ‘hard copy’ board of assessment; When will the result of X be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.