माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 03:40 PM2023-12-30T15:40:44+5:302023-12-30T15:43:02+5:30

कारखान्याची अॅश हॅण्डलिंग सिस्टीम नादुरुस्त; गाळप संपेपर्यंत सहन करावा लागणार त्रास

Harmful carbon layer spread over Majalgaon; Citizens suffering due to soot from Jai Mahesh factory | माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त

माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव :
येथून जवळच असलेल्या जय महेश शुगर्स साखर कारखान्याच्या धुराढ्यातून निघालेल्या काजळीमुळे माजलगाववर हानिकारक काळा थर पसरत आहे. शहरातील नदीकाठी असलेले रहिवासी यामुळे त्रस्त झालेत. घराघरात दररोज कार्बनचा साचलेला काळा थर स्वच्छ करताकरता महिलांच्या नाकीनऊ येत आहेत. विशेष म्हणजे, ही काजळी आरोगयास हानिकारक ठरत असून अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

शहरापासून जवळपास ५ कि.मी. अंतरावर असलेल्या एनएसएल शुगर्स या खाजगी ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याचे सध्या गाळप सुरू आहे. या गाळपामुळे तेथील बॉयलरचे धुराडे सतत पेटलेले असते या धुराढ्यातून मागील एक महिन्यापासून काजळी बाहेर पडत आहे.  दररोज रात्री व पहाटे वाऱ्याच्या प्रवाहानुसार ती काजळी हवेतून उडत माजलगाव शहरातील नदीकाठी असलेला भाग यामध्ये साठे नगर, पाटील गल्ली, रंगार गल्ली, सिद्धेश्वर नगर, सन्मित्र कॉलनी, खंडोबा मैदान आदी भागांमध्ये ही काजळी घराच्या गच्चीवर, घराच्या अंगणात व घरातील फरशीवर आढळून येत आहे.

हा कार्बनचा काळा थर स्वच्छ करता करता महिला त्रस्त झाल्या आहेत. या काजळीमुळे वयोवृध्दांना श्वसनाचा त्रास होऊ लागले आहेत. याबाबत माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक साखर कारखान्यावर अशा पद्धतीने राख उडून  जाऊ नये यासाठी ऍश हॅण्डलिंग सिस्टीम असते या सिस्टीम मुळे काजळी उडण्या ऐवजी खाली पाण्याचा सुरू असलेल्या प्रवाहात जाऊन पडते व त्यामुळे ती उडत नाही .याबाबत महसूल प्रशासनाने तात्काळ प्रदूषण महामंडळाची संपर्क साधून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एक महिन्यापासून त्रास 
मागील जवळपास एक महिन्यापासून सदरील काजळीचा काळा थर दररोज आमच्या अंगणात घरात व गच्चीवर पडत आहे.
- डॉ. सचिन देशमुख, रहिवासी, सन्मित्र कॉलनी

कारखान्याची सिस्टीम फेल
आमच्या कारखान्याची अॅश हॅण्डलिंगसिस्टीम मागील अनेक दिवसांपासून फेल झालेली आहे. परंतु, ती दुरुस्त करण्यासाठी बॉयलर बंद करावे लागते.सध्या गाळप सुरू असल्याने बॉयलर बंद करता येत नाही. त्यामुळे ज्यावेळेस बॉयलर बंद करण्यात येईल त्यावेळेस सदर यंत्रनेची दुरुस्ती करण्यात येईल.
- व्यंकट कृष्णाराव, प्रशासकीय व्यवस्थापक जय महेश शुगर्स

Web Title: Harmful carbon layer spread over Majalgaon; Citizens suffering due to soot from Jai Mahesh factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.