आडसकरांची हॅटट्रीक
By Admin | Published: January 17, 2017 12:12 AM2017-01-17T00:12:29+5:302017-01-17T00:14:07+5:30
अंबाजोगाई अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी रमेश आडसकर यांच्या लोकनेते बाबुरावजी आडसकर शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले.
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई
जिल्ह्यातील पहिली सहकारी संस्था म्हणून ख्याती असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी रमेश आडसकर यांच्या लोकनेते बाबुरावजी आडसकर शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. प्रतिस्पर्धी दत्तात्रय पाटील यांच्या अंबासाखर पुनर्जीवन पॅनलला धोबीपछाड देत आडसकर यांनी सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या.
आडसकर व पाटील या भाजपच्या दोन दिग्गजांनी स्वतंत्र पॅनल उभे करून प्रतिष्ठा पणाला लावली होती. संचालकपदांच्या २१ जागेसाठी ४३ जण आखाड्यात होते. रविवारी ५२ केंद्रांवर शांततेत मतदान झाले. एकूण १८५०० पैकी १२४४१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
मंगळवारी सकाळी ८ वाजता येथील अध्यापक महाविद्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. तब्बल १३ तास मॅरेथॉन मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. आडसकरांनी जोरदार मुसंडी मारून पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.
विजयी उमेदवार असे
वसंत बळीराम चव्हाण- ७१२४, हनुमंत निवृत्ती मोरे- ७०८९, औदुंबर भाऊसाहेब शिंदे- ६८७८, रमेश बाबुराव आडसकर- ७३८९, बब्रूवान रावण खुळे -७०७२, तुळशीराम पांडुरंग राऊत- ७०५१, तानाजी देविदास देशमुख- ७१७१, वसंतराव नारायणराव हारे- ७०२४, श्रीराम गणपत मुंडे- ६९६२, शिवराम सखाराम कदम- ७१०५, अनंत राजेसाहेब पाटील- ७१२३, सुनील अनंत शिंदे - ६९८३, निवृत्ती संतराम चेवले- ७०४३, प्रमोद चंद्रकांत जाधव- ६९६२, जनार्धन रामचंद्र माने- ६९६९, अशोक भागवतराव गायकवाड- ७२५८, सुमन गौतम चौधरी - ७१९८, पूनम बालाजी नांदवटे - ६९५५, अजय शेषेराव ढगे - ७३४७, राजकिशोर कांताप्रसाद मोदी - ७४४५, दाजीसाहेब काशीनाथराव लोमटे- ९० हे उमेदवार विजयी झाले.
अंबाजोगाई, केज, परळी, धारूर व रेणापूर तालुक्यातील ३४४ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीत आडसकर व पाटील या दोन पॅनलमध्ये लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अनेक नेत्यांपैकी कोणी पाटलांना तर कोणी आडसकरांना पाठिंबा दर्शविला होता.