हिवऱ्यात हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:08 AM2019-03-18T00:08:23+5:302019-03-18T00:09:36+5:30

आष्टी तालुक्यातील हिवरा शिवारात सुरू असलेला हातभट्टीचा दारू अड्डा स्थानिक गुन्हे शाखेने उद्धवस्त केला.

Havana spoiled the pistol | हिवऱ्यात हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त

हिवऱ्यात हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देएलसीबीची दुसरी मोठी कारवाई, १४०० लिटर रसायन, १०० लिटर दारू नष्ट

बीड : आष्टी तालुक्यातील हिवरा शिवारात सुरू असलेला हातभट्टीचा दारू अड्डा स्थानिक गुन्हे शाखेने उद्धवस्त केला. १४०० लिटर रसायन आणि १०० लिटर तयार केलेली दारू नष्ट केली. ही कारवाई रविवारी सायंकाळी पाच वाजता केली. सलग दुसऱ्या दिवशी एलसीबीची दुसरी मोठी कारवाई आहे.
हिवरा शिवारात हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पथक पाठविले. पथकाने सकाळपासूनच सापळा लावला. सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये भानुदास नाना गायकवाड (५५ रा.सुलेमान देवळा ता.आष्टी) याला ताब्यात घेतले. सर्वत्र तपासणी केली असता बॅलरमध्ये रसायन असल्याचे दिसले. १४०० लिटर रसायन आणि बनविलेली १०० लिटर दारू नष्ट केली. भानुदास विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोना प्रसाद कदम यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, शनिवारी पहाटेच राजुरी येथे धाड टाकून दोन दारू अड्डे उद्धवस्त केले होते. यामध्ये ६ हजार लिटर रसायण आणि २०० लिटर दारू नष्ट करण्यात आली होती. आता ही सलग दुसºया दिवशी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे प्रसाद कदम, परमेश्वर सानप, कल्याण तांदळे, सखाराम सारूक, साजेद पठाण, नरेंद्र बांगर, सतीश कातखडे, संजय जायभाये आदींनी केली.

Web Title: Havana spoiled the pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.