पावसाचा कहर ! स्मशानभूमीत ही गुढगाभर पाणी, अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 06:35 PM2021-09-29T18:35:27+5:302021-09-29T18:37:12+5:30
या तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर काढून देण्यात आले आहे. मात्र तो प्रवाह अत्यल्प असल्याने स्मशानभूमीत मोठया प्रमाणात पाणी येते.
अंबाजोगाई-: माणसाचा शेवट तरी गोड व्हावा.असे म्हणले जाते.मात्र अतिवृष्टीमुळे अंबाजोगाईत शेवटचा प्रवासही त्रासदायक ठरला आहे. गुढगाभर पाण्यात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाईकरांवर आली आहे.
अंबाजोगाई शहरातील रविवारपेठ परिसरातील बोरूळतलाव स्मशानभूमी बोरूळ तलावाच्या काठावर आहे.अंबाजोगाईत सतत पडणणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव ओसंडुन वाहू लागला आहे.दिवसेंदिवस नद्या,तलाव यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. परिणामी बोरूळ तलाव स्मशानभूमी च्या परिसरात ही पाणी मोठया प्रमाणात साठले आहे.शहरातील बहुतांश अंत्यविधी याच स्मशानभूमीत होतात.
या ठिकाणी मोठया प्रमाणात साठलेल्या पाण्यामुळे अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर काढून देण्यात आले आहे. मात्र तो प्रवाह अत्यल्प असल्याने स्मशानभूमीत मोठया प्रमाणात पाणी येते.या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेवटच्या प्रवासासातही मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.