सश्यासाठी स्वतःचा जिव घातला धोक्यात, ४० फुट खोल विहीरीत उतरुन वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:53 PM2022-10-27T17:53:01+5:302022-10-27T17:54:04+5:30

कडा - रात्रीच्या अंधारात अन्न शोधताना ससा ४० फुट खोल विहीरीत पडला. त्या सश्याचे प्राण वाचवण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्या ...

He risked his own life for rabbit, saved his life by descending into a 40 feet deep well | सश्यासाठी स्वतःचा जिव घातला धोक्यात, ४० फुट खोल विहीरीत उतरुन वाचवले प्राण

सश्यासाठी स्वतःचा जिव घातला धोक्यात, ४० फुट खोल विहीरीत उतरुन वाचवले प्राण

googlenewsNext

कडा - रात्रीच्या अंधारात अन्न शोधताना ससा ४० फुट खोल विहीरीत पडला. त्या सश्याचे प्राण वाचवण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. तरुणाने दोरीच्या सहाय्याने विहीरीत उतरुन सश्याला सुखरुप बाहेर काढले. त्या तरुणाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील कडा येथील किशोर भंडारी यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच दिवसापासून एक जंगली ससा पडला होता. त्यांनी सश्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. मग या घटनेची माहिती प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना मिळाली. ते राजेंद्र घोडके यांना घेऊन त्या ठिकाणी गेले. विहिरीत पडलेला ससा कपारीच्या आडोशाला उपाशी पोटी व्याकूळ होऊन बसलेला दिसला. हे पाहताच नितीन आळकुटे हे दोरीच्या सहाय्याने खाली उतरले आणि त्याला सुखरूप बाहेर काढले.

Web Title: He risked his own life for rabbit, saved his life by descending into a 40 feet deep well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड