कोरोना लसीकरणाबाबत विभाग प्रमुखच गाफील, पालिका पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:36+5:302021-02-26T04:47:36+5:30

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात कोरोना लस घेण्याबाबत वारंवार आवाहन करूनही लाभार्थी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ...

The head of the department is oblivious to the corona vaccination, the municipality is behind | कोरोना लसीकरणाबाबत विभाग प्रमुखच गाफील, पालिका पिछाडीवर

कोरोना लसीकरणाबाबत विभाग प्रमुखच गाफील, पालिका पिछाडीवर

Next

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात कोरोना लस घेण्याबाबत वारंवार आवाहन करूनही लाभार्थी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत केवळ ५१ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. विभाग प्रमुखांना सूचना करूनही त्यांनी स्वत: व आपल्या कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी पाठविले नाही. यात नगरपालिका व पंचायत विभाग सर्वात पिछाडीवर आहे.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोरोना लस देण्यासाठी केंद्र स्थापन केलेले आहे. दररोज २०० लोकांना लस दिली जाईल, असे नियोजनही केलेले आहे; परंतु लाभार्थीच पुढे येत नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ७२१ जणांनी लस घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे; परंतु यापैकी केवळ १५ हजार १५७ लोकांनी लस घेतली आहे. अद्यापही १४ हजार ५६४ जण लस घेण्यात मागे आहेत.

दरम्यान, आजही अंबाजोेगाईचे स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी लसीकरणासाठी पुढे आलेले नाहीत. येथील अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जात नसल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. अंबाजोगाईत ३७ टक्के तर जिल्हा रुग्णालयात ४४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

उपायुक्तांनी दिल्या सूचना

कोरोना लसीकरणाबाबत बुधवारी औरंगाबादचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील लसीकरणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विभाग प्रमुखांचे नियोजन नसल्याचे सांगत त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. आपल्या कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी रांगेत उभे करा आणि लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात आले.

कोरोना लसीकरणाबाबत अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. लस सुरक्षित असल्याचे सांगूनही लाभार्थी पुढे येत नाहीत. संपर्क करण्यासही आवाहनही केले जात आहे. बुधवारपर्यंत ५१ टक्के लसीकरण पूर्ण झाले होते.

डॉ.संजय कदम, नोडल ऑफिसर बीड

लसीकरणाची विभागनिहाय आकडेवारी

लस घेतलेले बाकीएकूणटक्केवारी

सरकारी आरोग्य कर्मी ७१२४ ४९३५ १२०५९ ५९.०८

खासगी आरोग्यकर्मी १८६२ १७२५ ३५८७ ५१.९१

पोलीस विभाग २१५५ १३६६ ३५२१ ६१.२०

महसूल विभाग ४७३ ४२० ८९३ ५२.९७

पंचायत राज ३२३१ ५१९८ ८४२९ ३८.३३

नगरपालिका ३१२ ९२० १२३२ २५.३२

एकूण १५१५७ १४५६४ २९७२१ ५१.०

Web Title: The head of the department is oblivious to the corona vaccination, the municipality is behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.