पिकांमध्ये पाणी साचल्याने डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:25+5:302021-07-14T04:39:25+5:30

दुपारीच शहराला लाॅकडाऊनचे स्वरूप शिरुर कासार : सोमवारी संततधार पाऊस झाला, तर मंगळवारी सकाळी उघडीप दिली होती. शहरात ...

Headaches due to stagnant water in crops | पिकांमध्ये पाणी साचल्याने डोकेदुखी

पिकांमध्ये पाणी साचल्याने डोकेदुखी

Next

दुपारीच शहराला लाॅकडाऊनचे स्वरूप

शिरुर कासार : सोमवारी संततधार पाऊस झाला, तर मंगळवारी सकाळी उघडीप दिली होती. शहरात दुकानात ग्राहक खरेदी करत असतानाच पावसाने पुन्हा हजेरी लावली. पाऊस कमी जास्त येण्याच्या भीतीने नागरिकांनी घर जवळ केले. परिणामी, रस्त्यावर अघोषित लाॅकडाऊन दिसून येत होता.

सोयाबीन संरक्षक म्हणून एरंडी बियांचा वापर

शिरूर कासार : यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. अळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोयाबीन भोवताली एरंडीच्या बियांचा वापर शेतकरी करत आहेत. एरंडीचे बी संरक्षक म्हणून चांगले उपयोगी पडू शकते, असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. कपाशीभोवतीही एरंडी बिया लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागताला सज्ज

शिरूर कासार : प्रदीर्घ काळानंतर कोरोनाने बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने, आता गुरुवारपासून शाळा गजबजणार आहेत. त्या अनुषंगाने शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले जात आहे. घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी सध्या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक आपापल्या परिने प्रयत्न करत असून, पालकांची संमती घेऊन विद्यार्थी शाळेत दाखल होणार आहेत, तर शिक्षक कोरोना तपासणीही करून घेत असल्याचे दिसून आले.

जुन्या घरांची डागडुजी

शिरुर कासार : सध्या रोजच पडत असलेल्या पावसामुळे जुनाट घरांना गळती लागत आहे, शिवाय भिंतीची झालेली पडझड दुरुस्ती केली जात आहे. गळती थांबविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून मेनकापड, ताडपत्री झाकून तूर्तास सोय केली जात असल्याचे दिसून येते.

Web Title: Headaches due to stagnant water in crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.