शिक्षकांच्या अडवणुकीतून मुख्याध्यापकांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:02 AM2019-04-03T00:02:23+5:302019-04-03T00:02:54+5:30

सेवा पुस्तिका आॅनलाईन करण्यासह वेतन निश्चिती व इतर कामांची कार्यालयीन प्रमुख म्हणून जबाबदारी असताना मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात आहे.

Headmaster's scolding | शिक्षकांच्या अडवणुकीतून मुख्याध्यापकांचा डल्ला

शिक्षकांच्या अडवणुकीतून मुख्याध्यापकांचा डल्ला

Next
ठळक मुद्देसेवापुस्तिका, वेतन निश्चितीचे कर्तव्य सोडून वसुलीवरच डोळा

बीड : सेवा पुस्तिका आॅनलाईन करण्यासह वेतन निश्चिती व इतर कामांची कार्यालयीन प्रमुख म्हणून जबाबदारी असताना मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात आहे. सोमवारी पाटोदा तालुक्यातील वाहली येथे अशाच एका प्रकरणात कामासाठी लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आल्याने सुरु असलेल्या गैरप्रकाराला पुष्टी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा कामांतून तीन कोटींची उलाढाल होत असल्याचे पुढे आले आहे.
सेवा पुस्तिका आॅनलाईन करणे, मासिक देयके तयार करणे, फरक काढणे, वार्षिक वेतनवाढ, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी वेतन पडताळणी करुन निश्चिती करणे, सेवा, शर्ती, अटींची पूर्तता करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. कार्यालय प्रमुख असल्याने ही कामे करणे मुख्याध्यापकांचे कर्तव्य आहे. कोणताही आर्थिक व्यवहार होऊ नये असे अपेक्षित असताना मात्र शिक्षकांकडून या कामासाठी पैसे उकळले जात आहे. जिल्हा परिषदेतंर्गत बीड जिल्ह्यात दहा हजारापेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत. मागील दीड महिन्यापासून त्यांची अडवणूक होत असल्याची बाब पुढे आल्यानंतर काही संघटनांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार करुन याला पायबंद घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर बैठकही झाली, मात्र पळसाला पाने तीनच याप्रमाणे दुर्लक्ष झाले.
त्यानंतर शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, भगवान सोनवणे, वित्त अधिकारी के.एन. कुटे, विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सभापती राजेसाहेब देशमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिक्षण सभापतींनीही या बाबत दखल घेत आर्थिक मागणी कोणी करत असल्यास तक्रार करण्याचे तसेच आर्थिक व्यवहार करु नये अशी ताकीद दिली होती. मात्र अद्यापपर्यंत काहीही फरक पडला नाही. पैसे मोजणाऱ्यांच्या कामांचा उरक होऊ लागल्याने आपली कामे तुंबल्यास पुढील कार्यवाहीला विलंब होईल म्हणून अनेक शिक्षक या गैरप्रकाराला बळी पडले.
नियमानुसार मुख्याध्यापकांनी प्रमुख या नात्याने ही जबाबदारी पार पाडणे आवश्यक असताना अडवणुकीचे धोरण अवलंबिले आणि यातून उखळ पांढरे केले. सोमवारी पाटोदा तालुक्यातील वाहली येथील जि.प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ गोरखनाथ लाड यांना एका शिक्षकाच्या ७ व्या वेतन आयोगाच्या वेतनवाढीच्या फाईलवर स्वाक्षरी करुन ती लेखा विभागाकडे सादर करण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेताना पकडले. या प्रकारानंतर मात्र मुख्याध्यापक सावध झाले आहेत.
अलिखित ठरलेला दर ३ हजार रुपये
यात सेवापुस्तिका आॅनलाईन करणे, मासिक वेतन, सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात १० हजार ३०० च्या आसपास शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षकाला त्याच्या या कामासाठी ३ हजार रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे अशा अडवणुकीतून सुमारे ३ कोटी रुपयांची मलाई मारण्याचे काम होत आहे.
५०० रुपयाला ठोकळा
वेतन पडताळणीनंतर वेतननिश्चिती होऊन त्यावर वित्त विभागाचा ठोकळा आवश्यक असतो. प्रत्येक कर्मचाºयाला सेवा पडताळणी अंतीम निश्चितीसाठी ५०० रुपये मोजावे लागत आहे. वित्त विभागातील लेखाधिकारी व कनिष्ठ लिपिक ही कामे करतात. केवळ काम लवकर होण्यासाठी कर्मचारी, शिक्षक ही रक्कम मोजत असलेतरी या गैरप्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

Web Title: Headmaster's scolding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.