सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:49+5:302021-07-31T04:33:49+5:30
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री धारुर : पावसाळा सुरू झाला असून, अस्वच्छतेच्या वातावरणात अन्न पदार्थांची विक्री केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ ...
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
धारुर : पावसाळा सुरू झाला असून, अस्वच्छतेच्या वातावरणात अन्न पदार्थांची विक्री केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांची दुकाने लावली जात आहेत. यावर न. पा. तसेच अन्न, औषध प्रशासनाने कारवाई करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करावेत
वडवणी : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना बँकांनी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास कानसूरकर यांनी केली आहे.
कोचिंग क्लासेससाठी परवानगीची मागणी
माजलगाव : खासगी शिकवण्या सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. कोरोना कालावधीत बंद असलेले सर्व व्यवसाय आता सुरू होत आहेत. फक्त शिकवणी वर्ग बंद आहेत. त्यामुळे खासगी शिकवणी घेणारे आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बँकांत दलालांकरवी होतेय फसवणूक
बीड : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. कामे करून घेण्यासाठी दलालांना पैसे द्यावे लागत असल्याने नागरिक फसत आहेत.
पशुधनात घट; दुग्धव्यवसाय संकटात
बीड : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय डबघाईस आला आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी-म्हशी असायच्या. परंतु आता पशुधनात प्रचंड घट झाली आहे.
रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
गेवराई : तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. आता पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून हे घाण पाणी वाहनधारक, वाटसरूंच्या अंगावर उडून जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.