डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे

By सोमनाथ खताळ | Published: February 23, 2024 06:25 PM2024-02-23T18:25:17+5:302024-02-23T18:25:17+5:30

काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटले आणि मळणीयंत्रात अडकला

Headscarves got caught in the threshing machine; The woman's head is split in a moment | डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे

डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे

सोमनाथ खताळ, बीड: ज्वारीचे खळे करताना डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रात अडकले. यामुळे यंत्रात अडकून महिलेचे मुंडकेच धडावेगळे झाले. ही घटना पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे गुरुवारी दुपारी घडली. अंजना श्रीधर जगताप (वय ५५) असे मयत महिलेचे नाव आहे. सध्या ज्वारी, सोयाबीनचे खळे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. यासाठी मळणीयंत्र लावले जाते. त्यातच उन्हाचा चटकाही जाणवत असल्याने काम करताना महिला, पुरुष डोक्याला रूमाल, स्कार्फ बांधत असतात. हेच डोक्याला बांधलेले स्कार्फ एका महिलेच्या जिवावर बेतले.

काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटले आणि मळणीयंत्रात अडकले. यामुळे वेगाने सुरू असलेल्या यंत्रणाने अंजना जगताप यांना खेचले. यात यंत्रात मुंडके अडकल्याने धडावेगळे झाले. काही समजण्याच्या आतच या महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर नातेवाइकांनी आक्रोश केला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता डोमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Headscarves got caught in the threshing machine; The woman's head is split in a moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.