कोरोना लस घेण्यात हेल्थ केअर वर्कर सर्वात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:24+5:302021-02-10T04:33:24+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून आतापर्यंत हेल्थ केअर वर्करने सर्वात पुढे होऊन लस घेतली आहे. तर ...
बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून आतापर्यंत हेल्थ केअर वर्करने सर्वात पुढे होऊन लस घेतली आहे. तर आतापर्यंत केवळ ७०६ फ्रंटलाईन वर्करने ही लस घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टापैकी ६४ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली. सुरूवातील पाच ठिकाणी केंद्र तयार केले. नंतर हीच संख्या ९ करण्यात आली. आता फ्रंटलाईन वर्करलाही लस दिली जात असल्याने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली आहे. आता प्रत्येक तालुक्यात एक केंद्र असे ११ केंद्र तयार केले आहेत. प्रत्येक ठिकाणी फ्रंटलाईन वर्कर १०० व हेल्थ केअर वर्कर १०० असे२०० चे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असले तरी फ्रंटलाईन वर्कर पुढे येऊन लस घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत २ हजार ५०० फ्रंटलाईन वर्करने लस घेणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात केवळ ७०६ लोकांनी ही लस घेतल्याचे समोर आले आहे. तर आरोग्यकर्मिंची संख्या ७ हजार ४७२ एवढी आहे. उद्दिष्टापैकी ७३ टक्के लसीकरण झाले आहे.
नोडल ऑफिसरकडून आढावा - फोटो
लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यासह तेथे लाभार्थीही वाढावेत, यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेत लसीकरणाचे नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम यांनी मंगळवारी दुपारी आढावा घेतला. सर्वांना लसीकरण वाढविण्यासाठी सूचना केल्या. तसेच यासाठी नियोजन करण्यासही सांगितले.
अशी आहे आकडेवारी
लसीकरण केंद्र - ११
हेल्थ केअर वर्कर -उद्दिष्ट १० हजार २०० - प्रत्यक्ष पूर्ण ७ हजार ४७२
फ्रंटलाईन वर्कर - उद्दिष्ट २५०० - प्रत्यक्ष पूर्ण ७०६
एकूण उद्दिष्ट - १२ हजार ७००
प्रत्यक्ष लसीकरण - ८ हजार १७८
टक्केवारी - ६४
----
कोट
लसीकरणात हेल्थ केअर वर्कर सर्वात पुढे आहेत. फ्रंट लाईन वर्कर असलेल्यांना बोलावले जात आहे, परंतु अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. लाभार्थी वाढविल्याने लसीकरण केंद्रही प्रत्येक तालुक्यात एक केले आहे. लस सुरक्षित असून मनातील गैरसमज काढून ती घ्यावी.
डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड