बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचेच ‘आरोग्य’ धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:27 AM2018-07-04T01:27:50+5:302018-07-04T01:28:10+5:30
बीड : जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच निवासस्थानांची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी न झाल्याने दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाºयांना रहावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर पालिका व आरोग्य विभागातील वरिष्ठांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
नगर पालिका व जिल्हा परिषदेच्या मध्ये जिल्हा रूग्णालयायातील कर्मचा-यांची शासकीय निवासस्थाने आहेत. शेकडो कर्मचारी येथे राहतात. २४ तास दुसºयांच्या आरोग्याची काळजी घेणाºया कर्मचाºयांचेच आता आरोग्य धोक्यात आल्याचे समोर आले आहे. या निवासस्थान परिसरात वेळेवर नाल्यांची सफाई पालिककेकडून केली जात नाही. तसेच कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ड्रेनेज पाईपही फुटले असून मागील अनेक महिन्यांपासून त्याची दुरूस्ती झालेली नाही. विशेष म्हणजे आता कर्मचारीही तक्रार करून थकले असून त्यांनी वरिष्ठांकडे जाणेच कमी केल्याचे सांगण्यात आले.
एवढी गंभीर परिस्थिती असतानाही याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाºयांमधून संताप व्यक्त होत आहे. येथील स्वच्छता करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील कर्मचाºयांमधून होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.