जातेगाव आरोग्य केंद्राला बेडसह आरोग्य साहित्य भेट - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:31 AM2021-05-01T04:31:56+5:302021-05-01T04:31:56+5:30
गेवराई : तालुक्यातील जातेगाव येथील जय बजरंगबली युवा सेवाभावी संस्थेतर्फे अध्यक्ष राधेशाम लेंडाळ आणि सर्व सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जातेगाव ...
गेवराई : तालुक्यातील जातेगाव येथील जय बजरंगबली युवा सेवाभावी संस्थेतर्फे अध्यक्ष राधेशाम लेंडाळ आणि सर्व सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पाच बेड, सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय कदम, तलवाडा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, डी. एच. शेख, वसंत पवार, अनिल चाळक, आयुब पठाण, गणेश जवळकर, राधा रोडे, शरद बनसोडे उपस्थित होते. या मदतीमुळे आरोग्य यंत्रणेचा भार काही प्रमाणात का होईना कमी होणार असल्याचे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राधेशाम लेंडाळ यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मीकांत लेंडाळ, कृष्णा लेंडाळ, सुरेश पांढरे, बंडू चव्हाण, अशोक लेंडाळ, गोविंद चांभारे, शाम वादे, राधेशाम आप्पा धोंडरे, विजयसिंह यमगर, कैलास पवार, अक्षय मरकड, विष्णू लेंडाळ, गणेश पवणे, लहू मस्के, बापूराव चव्हाण, मारूती लेंडाळ, ज्ञानेश्वर लेंडाळ व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.