बीडचे मंडलेचा औरंगाबादच्या महापालिकेचे आरोग्य अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:52+5:302021-05-23T04:33:52+5:30
बीड जिल्हा रूग्णालयात काही महिन्यांपूर्वीच डॉ. मंडलेचा रूजू झाले होते. बधिरीककरण तज्ज्ञ असलेले मंडलेचा यांनी परळी उपजिल्हा रूग्णालयाचा वैद्यकीय ...
बीड जिल्हा रूग्णालयात काही महिन्यांपूर्वीच डॉ. मंडलेचा रूजू झाले होते. बधिरीककरण तज्ज्ञ असलेले मंडलेचा यांनी परळी उपजिल्हा रूग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक म्हणून कारभार सांभाळला. त्यापूर्वी पुणे येथे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्रात तीन वर्षे कर्तव्य बजावले. राज्यातील दोनपैकी एक असलेल्या पुण्याच्या आयआरएल प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडली. राज्याच्या औषधी भांडारचाही कारभार त्यांनी यशस्वीरित्या पार पडला होता. कामाचा अनुभव असलेल्या डाॅ.मंडलेचा यांनी बीडमध्येही ऑक्सिजन, खाटांचे नियोजन करण्यात धावपळ केली. आता त्यांची औरंगाबाद महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून नियूक्ती झाली आहे. आपण औरंगाबादमध्ये प्रामाणिक आणि सामान्यांसाठी दिवसरात्र सेवा देऊ, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
मुलगा लोकेशचेही दिल्लीत यश
पारस मंडलेचा यांचा मुलगा लोकेश याने दिल्लीतील एम्स येथे २०१८ साली झालेल्या नीट परीक्षेत राज्यातून तिसरा क्रमांक तर भारतात ३७ वा क्रमांक पटकावला होता. नंतर झीपमर परीक्षेत २१ व्या स्थानी होता. एम्सच्या रँकमध्ये तो ४१ व्या क्रमांकावर होता. वडिलांप्रमाणेच आपणही आरोग्य सेवा करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. मंडलेचा यांचाच आदर्श घेऊन लोकेशही रूग्णसेवा करत असल्याचे सांगण्यात आले.