कुसळंब कोविड केअर सेंटरला आरोग्य सभापतींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:04+5:302021-05-17T04:32:04+5:30
कुसळंबमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, मानवलोक संस्था अंबाजोगाई व कुसळंब ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने उभा केलेल्या कोविड केअर ...
कुसळंबमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, मानवलोक संस्था अंबाजोगाई व कुसळंब ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने उभा केलेल्या कोविड केअर सेंटरला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी ३० गावातील रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना सकस आहार, योग्यप्रकारे उपचार योगासने तसेच ग्रामस्थांकडून मानसिक आधार मिळत असल्यामुळे या ठिकाणी रुग्ण ठणठणीत होऊन घरी जाऊ लागला आहे. नुकतीच जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बजरंग बप्पा सोनवणे यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांसोबत चर्चा केली. सर्वं सुविधा मिळतात का? जेवण व्यवस्थित मिळते का? डॉक्टर रोज राउंड मारतात का? अशी चौकशी केली. रुग्णांनी आम्हाला घरच्यापेक्षा ही चांगली सेवा मिळत असल्याचे सांगितले. सोनवणे यांनी सुविधा पाहून समाधान व्यक्त केेले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, डॉ. शहाणे, डॉ. शिवाजी पवार, मेजर शिवाजी पवार, सरपंच कुसलंब, शिवनाथ अण्णा पवार, बाळासाहेब पवार, आबासाहेब पवार, ॲड. विलास पवार, मंगेश पवार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
160521\img_20210512_105254_160_14.jpg