आरोग्य पथक, पोलीस दिसताच, वाहनधारकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:18+5:302021-06-06T04:25:18+5:30
वडवणी : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी करत, जागेवरच त्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे वाहनधारक ...
वडवणी : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी करत, जागेवरच त्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे वाहनधारक धास्तावले असून, पोलीस व आरोग्य पथक नजरेस पडताच, वाहनांची दिशा वळवित खुष्कीचा मार्गाने पळ काढत आहेत.
काेरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रत्येक शनिवार, रविवार कडक संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी वाहनधारकांना चोप देऊनही फारसा फरक पडला नाही. त्यामुळे शहरातील बीड-परळी हायवेवर शिवाजी महाराज चौकात पोलीस नाकाबंदी करत आहेत. शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही नेहमीप्रमाणे लोक गर्दी करत असल्याने, सपोनि नितीन मिरकर यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून विनाकारण घराबाहेर पडणारे दुचाकी, चारचाकी व विना परवानगी प्रवास करताना आढळून आलेल्या नागरिकांची अँटिजन चाचणीची मोहीम सुरू केली. सकाळी १० वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ४० जणांची तपासणी केली असता, सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, मनोज जोगदंड, रेवा गंगावणे, ए.एम. शेख, महेश गर्जे, नाना निगुळेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख नाकाबंदी करून मास्क न वापरणारे, बिनधास्त फिरणारे व्यक्ती, तसेच वाहनचालकांवर कारवाई केली, तर कोरोना चाचणीसाठी आरोग्यसेवक मनोज वाघमारे, भास्कर वाघे, रामदास घुलेसह कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
050621\rameswar lange_img-20210605-wa0006_14.jpg~050621\20210605_102943_14.jpg