माजलगावासह ९० गावांत आरोग्य पथकाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:59+5:302021-04-21T04:33:59+5:30
माजलगाव : घराघरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तपासणी व्हावी तसेच मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने झीरो डेथ ...
माजलगाव : घराघरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तपासणी व्हावी तसेच मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने झीरो डेथ मिशन सुरू केले आहे. त्याअंतर्गत माजलगाव शहर व तालुक्यातील ९० गावे, तांडे व वस्त्यांवर घराघरात जाऊन त्या घरातील नागरीकांची माहिती घेण्यात येत आहे. वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता येत्या काही दिवसात उदभवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.१९ एप्रिल ते १० मे या कालावधीत हे मिशन सुरू राहणार आहे. शहर व ग्रामीण भागातील खेडोपाडी,वाडी वस्ती,तांडे या ठिकाणी जाऊन कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेणे,कुटुंबातील सदस्यांची रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासणे, ९५ टक्के पेक्षा कमी असल्यास कोविड चाचणी करणे,६० वर्षावरील व्यक्तीची कोविड चाचणी करून घेणे,इतर आजार असल्यास उपचाराबाबत मार्गदर्शन करणे,आदि कामांसाठी १८० शिक्षक, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ही पथके घरोघरी जाऊन दिलेले सर्वेक्षणाचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत.
माहिती लपवू नका
तालुक्यातील कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू संख्या वाढत चालली आहे, हा मृत्यूदर शून्य करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असून ती यशस्वी होण्यासाठी जनतेने घरात असलेले रुग्ण न लपवता माहिती देऊन सहकार्य करावे
-- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी.
माजलगाव तालुक्यात झीरो मिशन डेथ कार्यक्रमांतर्गत घरोघरी नागरिकांची ऑक्सिजन पातळी व तापमान तपासले जात आहे.
===Photopath===
200421\purusttam karva_img-20210420-wa0031_14.jpg