वडणीत जुन्या भांडणातून शेतक-याचा तुरीच्या गंजीसह उभा ऊस पेटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:44 PM2018-02-02T23:44:14+5:302018-02-03T11:23:15+5:30
चिंचोटी येथे जुन्या भांडणातून उभ्या उसासह काढलेली तुरीची गंज पेटविल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. यामध्ये तब्बल अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले असून, वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : तालुक्यातील चिंचोटी येथे जुन्या भांडणातून उभ्या उसासह काढलेली तुरीची गंज पेटविल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. यामध्ये तब्बल अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले असून, वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचोटी येथील केशव अशोक गोंडे व अशोक भिकाराम गोंडे या दोन शेतक-यांचा मागील काही वर्षांपासून जमीन व रस्त्याचा वाद आहे. केशव गोंडे हे मामला शिवारातील शेतात दैनंदिन काम करत असताना गुरूवारी दुपारी अडीच्या सुमारास श्रीराम गोंडे, अशोक भिकाराम गोंडे, अंकुश गोंडे यांनी दीड एकर उभ्या उसाला आग लावली. यामध्ये उसासह पाण्यासाठी असलेले ठिबक सिंचनाचे पाईप व बांधावर शेतातून काढलेली तुरीची गंजही जळून खाक झाली. याप्रकरणी केशव गोंडे यांनी तिघांविरोधात वडवणी ठाण्यात फिर्याद दिली आहे.