बीड जिल्ह्यात मुसळधार : माजलगाव, बिंदुसरा धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:36+5:302021-09-07T04:40:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्याच्या अनेक भागात ४ व ५ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने ...

Heavy rains in Beed district: Majalgaon, Bindusara dam filled | बीड जिल्ह्यात मुसळधार : माजलगाव, बिंदुसरा धरण भरले

बीड जिल्ह्यात मुसळधार : माजलगाव, बिंदुसरा धरण भरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्याच्या अनेक भागात ४ व ५ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने माजलगाव, बिंदुसरा, सिंदफणासह जवळपास सर्वच लहान, मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दरम्यान, या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी वडवणी नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडालेल्या चिमुकल्याला वाचविताना बाप-लेकासह तिघे बुडाले. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे ही घटना घडली. गेवराई येथे घर पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माजलगाव धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने या धरणाचे सोमवारी पहाटे ६ वाजता ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून सिंदफणा पात्रात ८८ हजार क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तालुक्यातील सांडस चिंचोली गावाचा संपर्क तुटला आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरणही सोमवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरेसह सर्वच नद्यांना पूर आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. केज तालुक्यात केजडी नदीसह तालुक्यातील मस्साजोग व कोरेगाव परिसरातील नदी, नाल्यांना पूर आल्याने नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली. धारूर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलाव भरला असून, या तलावाला धोका निर्माण झाला आहे. आष्टी तालुक्यातील जवळपास मेहकरी प्रकल्पावगळता सर्वच धरणे भरली आहेत. गेवराई तालुक्यातील सर्वाधिक अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येथे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्यातही अनेक गावांचा नद्यांना आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला आहे.

Web Title: Heavy rains in Beed district: Majalgaon, Bindusara dam filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.