वादळी पावसाने अंबाजोगाई तालुक्यात मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:18+5:302021-02-20T05:36:18+5:30

अंबाजोगाई तालुक्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने ज्वारी, गहू ही पिके आडवी पडली.तर ज्वारी पावसामुळे ...

Heavy rains cause severe damage in Ambajogai taluka | वादळी पावसाने अंबाजोगाई तालुक्यात मोठे नुकसान

वादळी पावसाने अंबाजोगाई तालुक्यात मोठे नुकसान

Next

अंबाजोगाई तालुक्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने ज्वारी, गहू ही पिके आडवी पडली.तर ज्वारी पावसामुळे काळी पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरबरा शेतात काढून ठेवला होता. ते ढिगारे भिजून मोठे नुकसान झाले आहे. तर जोरदार वाऱ्याने ढिगारे विस्कटून गेले आहेत. आंब्याला आलेला मोहर ही झडून गेला आहे. काढणी पूर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या पावसाने रात्री पासूनच अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.पाऊस व वीज यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चौकट,

पंचनामे करून आर्थिक मदत द्या : नमिता मुंदडा

अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरबरा, टरबूज, आंबा व विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Heavy rains cause severe damage in Ambajogai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.